परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची अवहेलना केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी केलेलं आंदोलन आज तीव्र झालं. आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली तसंच ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेक आणि दुकानाची मोडतोड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी शांततेचं आवाहन केलं आहे.