पॅरिस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पलक कोहलीनं सलामीच्या सामन्यात फ्रान्सच्या मिलेना सूरीऊचा सलग दोन गेममध्ये पराभव केला, तर अव्वल मानांकित नीतेश कुमारनं टोक्यो कांस्य पदक विजेत्या मनोज सरकारचा पराभव केला. अव्वल मानंकित टी. मुरूगेसन हिनं रोझा मार्कोचा पराभव केला. तिरंदाजी स्पर्धेच्या वैयक्तिक गटात शीतल देवी हिनं मानांकन फेरीत दुसरा क्रमांक पटकावला, तर सरिताला नवव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
Site Admin | August 29, 2024 8:12 PM
पॅरालिम्पिक स्पर्धा २०२४ : बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पलक कोहलीनं फ्रान्सच्या मिलेना सूरीऊचा सलग दोन गेममध्ये पराभव केला
