पॅरिस इथं काल दिव्यांगांसाठीच्या पॅराऑलिम्पिक्स क्रीडा महोत्सवाचं भव्य सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या सोहळ्यात, 167 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4 हजार 400 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय चमूचं नेतृत्व सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव यांनी केलं. पॅराऑलिम्पिकच्या या स्पर्धेत 84 भारतीय दिव्यांग खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताच्या दिव्यांग क्रीडा इतिहासातलं हा सर्वात मोठा चमू स्पर्धेत 12 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या एकेरीचे विजेतेपद राखण्यासाठी कृष्णा नागर प्रयत्नशील असेल तर अवनी लेखरा, मनीष नरवाल नेमबाजीचं लक्ष्य ठेवणार आहेत. या व्यतिरिक्त भारतीय दिव्यांग खेळाडू तिरंदाजी, सायकलिंग, तायक्वोंदो, जलतरण आणि टेबलटेनिस या प्रकारांमध्येही सहभागी होणार आहेत. आजपासून अॅथलेटिक्स क्रीडा प्रकाराला सुरूवात होणार असून त्यामध्ये 38 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकची सांगता 9 सप्टेंबरला होणार आहे.
Site Admin | August 29, 2024 1:26 PM | Paralympic Games 2024: