रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला आज प्रारंभ झाला. या अभियानात १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातल्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येत असून हात स्वच्छ धुण्याचं प्रात्यक्षिकही देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या १ लाख ५० हजार मुलांना याचा लाभ मिळणार आहे. जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुखी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसंच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणं गरजेचे आहे.
Site Admin | December 6, 2024 5:07 PM