वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मृत महिलेच्या पतीची भेट घेऊन सांत्वन केलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करत त्यांनी याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.
याप्रकरणी आतापर्यंत आरोपी मिहीर शहा समवेत १२ जणांना अटक झाली असून त्याचे वडील राजेश शहा सध्या जामिनावर आहेत. पोलीस तपास सुरु आहे.