डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि धुळीचं वादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. लोनीच्या ग्रामीण भागात, वायुदलाचा हिंडन तळ, बहादुरगड, गाजियाबाद, इंदिरापुरम या भागात पावसाची शक्यता असून हरियाणाच्या वल्लभगढ, सोनीपत, खरखोडा, मत्तलहेल तर उत्तर प्रदेशातल्या बागपत, मेरठ, सिंकदराबाद, बुलंद शहर मध्ये मध्यम पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्याही अनेक भागात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून पालघर मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळं पालघर जिल्ह्यातल्या सुर्या, वैतरणा, देहर्जा नद्या ओसंडून वाहात असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफच्या २१० जवानांच्या ७ तुकड्या तमिळनाडूतल्या अराक्कोण इथल्या तळावरुन केरळकडे निघाल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा