पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडीपाडा येथून शुक्रवारी त्यांना पकडण्यात आलं. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ते पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर गावातून भारतात घुसले होते.
Site Admin | January 26, 2025 7:23 PM | Bangladeshi | Palghar