डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 14, 2025 6:18 PM | Palghar

printer

पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात मनोर इथल्या ट्रॉमा केअर सेंटर तसंच नंडोरे इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर आबिटकर बोलत होते. पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणाच्या समस्येचा बारकाईनं अभ्यास करून या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचंही आबिटकर यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा