पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, विक्रमगड आणि डहाणू नगरपरिषद क्षेत्रात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डी.इ.सी आणि अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी ८२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला याचा लाभ होईल. दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्व जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात हत्तीरोगाच्या जुन्या रुग्णांची संख्या ही ६२० आहे. हत्तीरोगामुळे अपंगत्व आलेल्या २३५ रुग्णांना जानेवारी महिन्यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आजपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेट देऊन वयोगटानुसार डीईसी आणि अल्बेंडाझॉल ही औषधं देणार आहेत.