डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 10, 2025 3:29 PM | Palghar

printer

नालासोपारा इथं रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चारजण जखमी झाले. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. परफ्यूमच्या बाटल्यांवरची वापराची शेवटची तारीख बदलण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाटल्यांचा स्फोट झाला, असं पोलिसांनी सांगितलं. जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. पुढचा तपास सुरु आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा