पाकिस्तानमध्ये पडणाऱ्या धुक्याचा तिथल्या नागरिकांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असून गेल्या महिन्याभरात पंजाब प्रांतातल्या सुमारे २० लाख लोकांना श्वसनासंबंधीचे उपचार घेणं भाग पडलं आहे. पाकिस्तानमधली लाहोर तसंच मुलतान ही दोन्ही शहरं जागतिक पातळीवरची सर्वाधिक प्रदूषित शहरं आहेत.
लाहोरमधल्या हवेच्या दर्जाच्या निर्देशांक बहुधा चौदाशेहून अधिक असतो. मुलतानमध्ये या निर्देशांकानं बऱ्याचदा २ हजाराची पातळी ओलांडली आहे. कराचीमधल्या हवेच्या दर्जाचा निर्देशांकही खूप खालावला असल्याचं आज सकाळच्या नोंदीवरून स्पष्ट झालं आहे.