डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाकिस्तानचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांची घुसखोरी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांनी ३ ॲपद्वारे घुसखोरी करून माहिती चोरी केल्याचं तपासात उघडकीला आलं आहे, असं उत्तर प्रदेशाचे दहशहतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पंकज अवस्थी यांनी या खटल्यादरम्यान दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या निशांतच्या वैयक्तिक संगणकांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर एटीएस आणि गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला संपूर्ण अहवाल सादर केला असून भविष्यात अशा प्रकारच्या ॲप्सचा धोका टाळाण्याबाबत विशेष दिशानिर्देशही जारी केले आहेत.या प्रकरणात नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं नुकतीच निशांतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा