पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या रेल्वे अपहरण प्रकरणात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप भारताने ठामपणे फेटाळला आहे. पाकिस्तानने केलेले आरोप निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितलं. ते पाकिस्तानने केलेल्या आरोपांंवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. जागतिक दहशतवादाचं केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत समस्या आणि अपयशासाठी इतरांना दोष देण्याऐवजी त्यांच्या देशात लक्ष घालावं, असंही जैस्वाल म्हणाले.
Site Admin | March 14, 2025 2:44 PM | India | Pakistan Train Hijack
पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला
