पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं तेहरीक ए इन्साफ पक्षाचे समर्थक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत सहा जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची घोषणा आज गृहमंत्रालयाने केली. आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसंच आवश्यकता असेल तर गोळीबार करण्याचे सुरक्षा दलाला गृहमंत्रालयानं दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटलं तर संचारबंदी लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमधल्या डी चौकावर मोर्चा काढल्यानंतर सरकार आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दोनदा चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Site Admin | November 26, 2024 7:22 PM | Pakistan