पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या हरनाई इथं रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात 11 कामगार ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले आहेत. कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहन जात असताना हा स्फोट झाला.
प्रगत स्फोटक यंत्राचा वापर करून ही रस्त्यावर स्फोटके पेरण्यात आल्याचा संशय हरनाईच्या पोलिस उपायुक्तांनी व्यक्त केला. दरम्यान, सुरक्षा दलांनी जखमींना रुग्णालयात हलवले आहे.