अमेरिकेने पुनर्वसनासाठी नाकारलेल्या अफगाण निर्वासितांना बेकायदेशीर स्थलांतरित मानलं जाईल आणि त्यांची पाकिस्तानमधून त्यांच्या मूळ देशात परत पाठवलं जाईल असं पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटलं आहे. या मुद्यावर अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासीतांना प्रवेश देण्याचा अमेरिकाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान पाकिस्ताननं त्यांच्या देशातील निर्वासीतांविरोधातली कारवाई अधिक तीव्र केली आहे.