पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
त्या आधी त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. दहशतवादाचा कणा मोडून टाकण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन गांधी यांनी दिलं. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली.