पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस कार्यकारिणीनं तीव्र निषेध केला आहे. नवी दिल्ली इथं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पाकिस्तानच्या कारस्थानातून झालेला हा भ्याड हल्ला म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक मूल्यांवर केलेला थेट आघात आहे. अशा विपरित स्थितीत शांत राहण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकारिणीनं या बैठकीत केल्याचं त्यांनी सांगितलं.
अमरनाथ यात्रा लवकरच सुरु होणार आहे. देशभरातले लाखे भविक ही यात्रा करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेला प्रधान्य दिलं पाहिजे, हे यावेळी नमूद करण्यात आलं.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियी गांधी, राहुल गांधी आणि कार्यकारिणीचे इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.