डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम दहशतवादा विरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने सीसीएसने  केलेल्या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

 

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व संभाव्य कृतींनाही आपला पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासनही सर्व विरोधी पक्षांनी सरकारला दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं काल नवी दिल्ली इथे  संसद भवन संकुलात बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं.

 

या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी पहलगाम इथल्या घटनेची आणि त्या विरोधात सीसीएसच्या बैठकीत भारत सरकारनं केलेल्या कृतींची माहिती दिली. सर्व पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करून त्या विरोधातल्या सर्व कृतींना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा