जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रधानमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांचे दुष्ट मनसुबे कधीच सफल होणार नाहीत, असं प्रधामंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.