पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्याच्या सीमा पाकिस्तानला आणि काश्मीरला लागून असल्यामुळे राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.