पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधे भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते.
पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यासाठी केलेल्या कोणत्याही लष्करी कारवाईत ब्रिटनमधले सर्व राजकीय पक्ष भारत सरकारसोबत एकजुटीने उभे राहतील, अशी आशाही ब्लॅकमन यांनी व्यक्त केली. या शोकसभेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. सर्वांनी काही क्षण मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली.