जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून व्यापक शोध मोहीमा राबवल्या जात आहेत. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बाज़ीपोरा कुलनार वनक्षेत्रात काही दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानं पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानं या भागातली घेराबंदी अधिक कठोर केली आहे.
आज सकाळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. दरम्यान, पंजाबच्या फिरोजपूर क्षेत्रात तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानं पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं आहे.