डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रपतींची भेट

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथे भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली. जर्मनी, जपान,पोलंड, युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते. 

 

दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये  काल सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत केंद्र सरकारच्या पाकिस्तान विरुद्धच्या सर्व निर्णयांना पाठिंबा देण्यात आला आणि हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं .

 

बैठकीत सर्व राज्यं  आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या  सुरक्षेचं  आवाहन करण्यात आलं .

 

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज  जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत. लष्करप्रमुख, परिसरातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. उच्च लष्करी कमांडर लष्करप्रमुखांना खोऱ्यात आणि नियंत्रण रेषेजवळील दहशतवादविरोधी उपाययोजनांबद्दल माहिती देतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा