थायलंडच्या पॉप्युलर फेउ थाई पार्टीने आज पेतोंगटार्न शिनावात्रा यांची देशाच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. उद्या प्रधानमंत्री पदासाठी होणाऱ्या संसदेच्या मतदानानंतर शिनावात्रा यांची निवड झाली तर त्या थायलंडच्या दुसऱ्या महिला प्रधानमंत्री बनतील. माजी प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना काल थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं पदच्युत केलं होतं. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे..
Site Admin | August 15, 2024 8:06 PM | Paetongtarn Shinawatra | Thailand