२०२५ च्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यंदा एक मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज करायचे आहेत. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान किंवा सेवा दिलेल्या व्यक्तींविषयीचा सर्व तपशील अर्जासोबत कमाल ८०० शब्दांत जोडावा, असं आवाहन केलेलं आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला हे पुरस्कार जाहीर केले जातील.
Site Admin | September 12, 2024 6:04 PM | Padma Awards-2025