सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच आज संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशा काही नियामक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय समितीने आता स्वतःहून घेतला असल्याचं सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं.
यावर महालेखापाल अर्थात कॅग च्या अहवालावर चर्चा करणं हे समितीचं काम असताना वेणुगोपाल यांनी नियामक मंडळांच्या कामकाजाची स्वतःहून दखल घेण्याची गरज नव्ह्ती असं भारतीय जनता पक्षाचे नेते रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.