भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडली आहेत. केंद्रीय डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे, डी मॅट खात्यांची एकूण संख्या आता १६ कोटीवर पोहोचली आहे. एका महिन्यात ४० लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडण्याची ही चौथी वेळ आहे. गेल्या गुरुवारी मुंबई शेअर बाजार तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवर पोहोचला होता.
Site Admin | July 6, 2024 6:16 PM | डी मॅट खात | भारतीय शेअर बाजार | मुंबई शेअर बाजार