सर्बियात बेलग्रेडमध्ये काल २९ हजारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन सरकारविरोधात निदर्शनं केली. गेल्या काही वर्षांमध्ये या देशात झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन ठरलं आहे. नोव्ही सॅड इथल्या रेल्वेस्थानकाचं छत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्या देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या स्थानकाचं दोन वेळा नूतनीकरण होऊनही हा अपघात झाला आहे. भ्रष्टाचार वाढल्यामुळे आणि निकृष्ट कामांमुळे हा अपघात झाल्याचा निदर्शकांचा आरोप आहे. वाढणारी निदर्शनं म्हणजे सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हुसिक यांच्या नेतृत्वाला आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.
Site Admin | December 23, 2024 12:17 PM | Serbia protest
सर्बियात बेलग्रेडमध्ये २९,०००हून अधिक नागरिकांचं सरकारविरोधात निदर्शन
