खाद्यतेलाच्या पूर्ततेसाठी १५ जुलैपासून राष्ट्रीय पाम लागवड प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पातंर्गत १५ राज्यांमधील एकूण १२ हजार हेक्टर जागेत १७ लाख पाम रोपांची लागवड करण्यात आली आहे. देशात पामच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच काही पाम तेलकंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, ओडीशा आणि तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये पाम लागवडीत लोकांनी उत्साहानं सहभाग नोंदवला. पाम लागवड प्रकल्प १५ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
Site Admin | September 7, 2024 8:03 PM | Palm Plantation