ओटीटी माध्यमं आणि त्यांच्या नियामक संस्थांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अनुसार भारताचे कायदे आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी हा सल्ला जारी करण्यात आला आहे. प्रसारित होणाऱ्या आशयाचं प्रेक्षकाच्या वयाच्या टप्प्यानुसार केलेलं वर्गीकरण योग्य रितीने करावं, असे निर्देशही त्यात दिले आहेत. ओटीटी माध्यमांवर अश्लील, बीभत्स आशयाच्या प्रसारणाबाबत विविध संसद सदस्य तसंच वैधानिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरून हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
Site Admin | February 20, 2025 8:24 PM | OTT Platforms
केंद्र सरकारचे OTT माध्यमांना दिशानिर्देश
