ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह इतरांची निर्मिती असलेल्या ‘अनुजा’ या लघुपटानं ९७व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट या विभागात नामांकन मिळवलं आहे. ऑस्करसाठीच्या अंतिम नामांकनांची घोषणा आज झाली. ‘अनुजा’ या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ॲडम ग्रेव्ह्ज यांनी केलं आहे. अनुजा या नऊ वर्षांच्या अतिशय प्रतिभाशाली मुलीची आणि तिच्यासमोर परिस्थितीनं निर्माण केलेल्या आव्हानांची कहाणी हा लघुपट सांगतो.
दरम्यान, यंदा ‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, नायिका, छायाचित्रण, ध्वनी, संकलन यासह सर्वाधिक १३ विभागांमध्ये नामांकन मिळवत बाजी मारली आहे. त्याखालोखाल ‘विकेड’ या चित्रपटानं १० नामांकनं मिळवली आहेत.