डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मिफमधे आज भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शनसत्र

१८वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा चौथ्या दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्रं आणि मार्गदर्शनसत्रं, तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शनसत्र  आज झालं. ॲनिमेशनपटांचा प्रवास आणि तरुण आणि मध्यमवयीनांना पडलेली ॲनिमेशनपटांची भुरळ यावर मुंजल श्रॉफ आणि केतन मेहता यांनी आपापले विचार मांडले. चरित्रात्मक माहितीपट आणि चरित्रपट यांच्यातला फरक राहुल रवैल आणि रॉबिन भट्ट यांनी उलगडून दाखवला. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू आणि द कमांडंट्स शो या चित्रपटाच्या दिग्दर्शक डॅनिएला वोल्कर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. द कमांडंट्स शो या चित्रपटाच्या चमूने आज रेड कार्पेटवरही हजेरी लावली. विख्यात ॲनिमेटर जॉर्ज श्वित्झगेबेल यांनी ॲनिमेशनचा मास्टरक्लास घेतला. याशिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले, बेबेल्सबर्ग चित्रपट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांचा आनंद चित्रपटप्रेमींनी लुटला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा