येत्या शुक्रवारी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप मार्केट इथं शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या योगा ऑन स्ट्रीट या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत. बोरिवलीतल्या कोरकेंद्र डोम, पोयसर जिमखाना संस्थेतर्फेही इथंही योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
पुण्यातही महापालिकेतर्फे शहरातील १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केलं आहे. पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेतही येत्या शुक्रवारी योग दिवस साजरा केला जाणार असल्याचं संस्थेचे संचालक प्रा. डॉ. के. सत्य लक्ष्मी यांनी सांगितलं.
नांदेड इथल्या यशवंत महाविद्यालय परिसरातील्या बहुउद्देशीय क्रीडा संकुलात आज मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. नांदेडच्या केंद्रीय संचार ब्युरोनं आयोजित केलेलं हे प्रदर्शन २१ जून पर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. आजपासून तीन दिवस योग शिबिरही होत आहे.