प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीशी संबंधित एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असून देशभरातील 120 सांस्कृतिक नृत्य पथकं आपली कला सादर करणार आहेत.
दरम्यान, प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमस्थानावर स्नान करुन पुजाअर्चना केली. संगमवरील स्नान ही दैवी अनुभूतीचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. त्यात सहभागी झालेल्या कोट्यावधी लोकांप्रमाणेच आपणही भक्तीच्या भावनेने भारलेले आहेत. गंगा माता देशवासीयांना शांती, ज्ञान, चांगले आरोग्य आणि सौहार्दाचे आशीर्वाद देईल अशी आशा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.
Site Admin | February 6, 2025 9:06 AM | जनजाती सांस्कृतिक संमेलन | महाकुंभ
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन
