प्रवासी तसंच कामगारांच्या समस्या आणि तक्रारी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी येत्या सोमवारपासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” आणि “कामगार पालक दिन” आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत संबधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी १० ते २ या सत्रात प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारणार आहेत. राज्यभरातल्या सगळ्या आगारांत दर सोमवारी आणि शुक्रवारी या दोन्ही उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.