नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी आणि अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कोरकू भाषा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ आणि १६ जुलै रोजी भोपाळ इथं हे संमेलन होईल. या संमेलनात मेळघाटातल्या कोरकू भाषा वाचिक महाकाव्यावर विचार मंथन होणार आहे. अमरावती जिल्ह्यातले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर काशिनाथ बराटे हे या साहित्य संमेलनात सहभागी होऊन कोरकू वाचिक महाकाव्याचा इतिहास या विषयावर सविस्तर विवेचन करणार आहेत. या संमेलनातून मेळघाटातल्या लोकसंस्कृती व भाषेचा इतिहास देशाच्या मुख्य प्रवाहात यायला मदत होईल, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक बराटे यांनी दिली आहे.
Site Admin | July 14, 2024 8:06 PM | राष्ट्रीय कोरकू भाषा साहित्य संमेलन | साहित्यिक काशिनाथ बराटे