रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून गावागावात एकत्रितपणे कारखाने उभारता येतील का, या दृष्टीनं विचार करून सर्वांनी प्रयत्न करावे, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या कार्यशाळेत केलं.
Site Admin | August 1, 2024 9:30 AM | इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा | रत्नागिरी
रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन
