महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात तृणधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत महोत्सव होणार असून यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत महोत्सवातल्या पन्नास दालनांमध्ये अस्सल तृणधान्यं आणि त्यापासून निर्मित नाविन्यपूर्ण असंख्य उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील.तृणधान्य उत्पादन, तृणधान्यांच्या महत्त्वाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिकं असे कार्यक्रमदेखील महोत्सवात होणार आहेत.
Site Admin | January 7, 2025 10:29 AM | तृणधान्य महोत्सव | पुणे