छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने कालपासून आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयात पाण्याच्या नळाची सुयोग्य जोडणी, सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा, सुस्थितीत असलेले छत तसंच दरवाजे, स्वच्छता, रंगरंगोटी, या निकषांनुसार उत्कृष्ट शौचालयाची निवड होणार आहे. १० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती तसंच ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं.
Site Admin | December 8, 2024 11:14 AM | आमचे शौचालय आमचा सन्मान | छत्रपती संभाजीनगर | स्पर्धा