मुंबईत वर्सोवा इथं उद्यापासून येत्या १२ जानेवारी पर्यंत ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ‘वेसावे कोळीवाड्यात हिंगळा देवी मंदिरात पारंपरिक प्रथेनं पूजेनंतर वेसावे कोळीवाड्यातून वाजत गाजत मिरवणूक निघते.
आणि त्यानंतर ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सवाचं उद्घाटन केलं जातं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, अंबरनाथ इथून ६० हजारांपेक्षा अधिक नागरिक आणि परदेशी पाहुणे या महोत्सवाला भेट देत असल्याचं वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र लदगे यांनी सांगितलं.