भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आजपासून केलं आहे. परिषदेच्या उद्घाटनाला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती होती.
जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे.
लोकशाही देशातील निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर, राजकीय प्रचारात, निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर यावर अवलंबून आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले.