देशभरात राबवलेल्या जनजागृती मोहिमांमुळं देशात अवयव दानासह उती दानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाचं लेखी उत्तर देताना सांगितलं. २०१८ दरम्यान असलेली ६ हजार २९४ इतकी असलेली अवयव दात्यांची संख्या २०२३ पर्यंत १६ हजार ५४२ पर्यंत पोचली आहे. या कालावधीत अवयव प्रत्यारोपणाची संख्या ७ हजाराहून १८ हजारापर्यंत वाढली आहे.
Site Admin | December 13, 2024 8:07 PM | Loksabha | Organ Donation | Prataprao Jadhav