प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर टीका केली. सार्वजनिक जीवनात शब्दांची निवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विरोधकांनी असंसदीय शब्द टाळावेत, असं ते म्हणाले.
तत्पूर्वी काही राजकीय पक्षांकडून तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी असंसदीय शब्द वापरले जाणं दुर्दैवी असल्याचं मत भाजपचे वक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही व्यक्त केलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेकवेळा अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याची टीका त्रिवेदी यांनी केली.