‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी विरोध केला आहे. संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध पक्षांच्या खासदारांनी याबाबत प्रतिक्रीया दिल्या. एक देश एक निवडणूक विधेयकाला आपल्या पक्षाचा विरोध असून सभागृहात मांडण्यापूर्वी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवावं अशी पक्षाची मागणी असल्याचं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं.राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी देखील अशीच मागणी केली. हे विधेयक असंवैधानिक असून राज्यांचं महत्त्व कमी करणारं असल्याचा आरोप स.पा.चे धर्मेंद्र यादव यांनी केला. तर हे विधेयक संघराज्याच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं सीपीआय एम चे जॉन ब्रिटास यांचं म्हणणं आहे.
Site Admin | December 17, 2024 1:10 PM | Loksabha | One Nation One Election