कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी खासदारांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
Site Admin | August 8, 2024 8:11 PM | Onion and Potato | Price Hike
कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांचं निदर्शन
