सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोयाबीनला ६ हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही, आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली. परभणी इथल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीला २० ते २५ दिवस मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
Site Admin | February 5, 2025 7:09 PM | Nana Patole | soyaben
सोयाबीन खरेदी केंद्र वाढवण्याची आणि सर्व खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवण्याची विरोधकांची मागणी
