डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 11, 2024 3:37 PM | Senior Citizens

printer

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशाभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशाभरातल्या  तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्यातून  पहिली रेल्वेगाडी  अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वेगाडी  नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. अयोध्येसमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या  सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा