वर्ष २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची मागणी १४ लाख ३० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढून १ हजार ६६ लाख बॅरल प्रति दिवस इतकी होईल, असा अंदाज पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’ने वर्तवला आहे. या वर्षी ही मागणी १४ लाख ५० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढण्याचा ‘ओपेक’चा अंदाज आहे.
जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या वृद्धीच्या आधारे जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी ३ पूर्णांक १ दशांश टक्क्याने, तर पुढच्या वर्षी ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांनी वाढेल, असा अंदाजही ‘ओपेक’च्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.