केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मूमध्ये काल भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर योग्यवेळी जम्मू-काश्मीला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं आपण स्वतः संसदेत ऑगस्ट 2019 मध्ये आश्वासन दिलं होतं, असंही ते म्हणाले. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं ती ऐतिहासिक असल्याचंही अमित शाह म्हणाले.
Site Admin | September 8, 2024 1:22 PM | Amit Shah | Home Minister Amit Shah
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
